मराठा आरक्षण मोर्चा बुधवारी सकाळी खराडी येथून लोणावळाच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे पुणे शहराकडून नगरकडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवाजीनगर परिसरातील स. ग. बर्गे भुयारी मार्ग, सिमला ऑफीस चौक, वाकडेवाडी, नर्गीस दत्त रस्ता, सुर्यामुखी दत्त मंदिर चौक, सेनापती बापट रस्ता येथील वाहतूक गरजेनुसार सकाळी आठ पासून वळविण्यात येणार आहे.
औंध व बाणेर रस्त्यावरून पुणे विद्यापीठ शिवाजीनगरकडे येणारी संपूर्ण वाहतूक सकाळी आठ पासून गरजेप्रमाणे बंद
– औंध रस्त्यावरून येणारी वाहतूक चौक ब्रेमन चौकामधून आवश्यकते प्रमाणे वळवण्यात येवून आंबेडकर चौक, बोपोडी येथुन हॅरिस ब्रीज मार्गे किंवा साई चौक खडकी पोलिस ठाणे अंडरपास मार्गे जुना – मुंबई पुणे हायवेवर येईल.
– बाणेर कडून विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर येणारी सर्व वाहने गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.
– महाबळेश्वर हॉटेल येथून बाणेर पाषाण लिंक रोड मार्गे सुस रस्ता येथे येवून शिवाजी चौक पाषाण मार्गे किंवा सुसखिंड मार्गे चांदणी चौक कोथरूड ते पुणे शहर अशी गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.
– बाणेर परिसरामधील वाहन चालक अभिमान श्री जंक्शन बाणेर रोड ते अभिमानश्री जंक्शन पाषाण रोडवरून उजवीकडे वळण घेवून शिवाजी चौक पाषाण चांदणी चौक कोथरूड मार्गे पुणे शहरकडे गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.
– पाषाण रोड परिसरातील वाहतूक गरजेप्रमाणो ठराविक वेळी वरील मार्गाने वळविण्यात येईल.
असा असेल मोर्चाचा मार्ग
खराडी, येरवडा, संगमवाडी, शिवाजीनगर सिमला ऑफीस , पुणे विद्यापीठ चौक, औंध, सांगवी फाटा, जगताप डेअरी चौक, डांगे चौक, चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, निगडी, देहूरोड, जुना पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव, सोमाटणे फाटा, लोणावळा
Read Latest Maharashtra News And Marathi News