• Sat. Jun 20th, 2026

    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 23, 2024
    बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 23: नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदनात आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

    कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त, रुपिंदर सिंग यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार यांनी  आणि  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

    महाराष्ट्र परिचय केंद्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed