Pune Lohagad Trek Groom Ketan Agarwal Death : केतनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा ४०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. किल्ल्यावर सेल्फी काढत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो घसरुन खाली पडला, गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चौघं जण लोहगडावर
केतन विशाल अग्रवाल असं २६ वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. तो पुण्याजवळील गहुंजे येथील रहिवासी होता. केतन एका रिअल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होता. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत होणारी पत्नी आणि दोन जवळचे मित्र होते.
जोरदार वाऱ्यांमुळे तोल गेला
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी लोहगडावर जोरदार वारे वाहत होते. सेल्फी घेताना तोल गेल्यामुळे तो खोल दरीत कोसळला. केतनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. Romanch Mahajan : घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या लेकाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला, महाजन कुटुंबावर शोककळा केतनच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवारी तीन तासांच्या परिश्रमानंतर केतनचं पार्थिव लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आलं. सायंकाळी केतनवर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केतनचा विवाह या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार होता. तिथे १४ कोटी रुपये खर्च करुन कुटुंबीयांनी एक आलिशान महालही बुक केला होता; तसेच उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते.
लोहगड किल्ल्याचा इतिहास
लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत एक महत्त्वपूर्ण किल्ला मानला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांपैकी हा एक आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि गिर्यारोहक भेट देतात. Kinjal Shah : विलेपार्ले स्टेशनजवळ इलेक्ट्रिक कारची धडक, भाजी खरेदीला आलेल्या विवाहितेचा अंत, 11 वर्षांचा लेक मायेला मुकला लोहगड पुण्यापासून ६५ किमी अंतरावर असलेला एक गिरीदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १,०३३ मीटर (३,३८९ फूट) उंचीवर वसलेला हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे. या किल्ल्याची निर्मिती साधारणपणे ११ व्या किंवा १२ व्या शतकात झाली असावी, असे मानले जाते.
या किल्ल्यावर यादव, निजाम, मुघल आणि मराठे अशा विविध राजवटींचे नियंत्रण होते. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६६५ च्या पुरंदरच्या तहानंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला, परंतु नंतर मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला. Pune Crime : भोंदू घाणेरडे व्हिडिओ पाहायचा, महिला अनुयायींसमोरच तरुणीवर अत्याचार, पुण्यात अंगावर शहारे आणणारा प्रकार मराठा राजवटीत या किल्ल्याचा वापर खजिना आणि महत्त्वाची सामग्री साठवण्यासाठी केला जात असे. ‘विंचू काटा’ ही येथील सर्वात प्रसिद्ध रचना आहे; ही विंचवाच्या नांगीसारखी दिसणारी एक लांब आणि खडकाळ भिंत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा