• Sat. Jun 20th, 2026

    मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २४ ते ३० जानेवारी दरम्यान विशेष व्याख्यान मालिका

    ByMH LIVE NEWS

    Jan 23, 2024
    मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २४ ते ३० जानेवारी दरम्यान विशेष व्याख्यान मालिका

    मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवडानिमित्त’ मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यान मालिका प्रसारित होणार आहे. ही विशेष व्याख्यानमाला 24 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

    मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.  दरवर्षी मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावे, यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तकांचा परिचय करून देणारी विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

    दिलखुलासकार्यक्रमात याप्रमाणे होणार व्याख्यानमालेचे प्रसारण

              बुधवार 24 जानेवारी 2024 रोजी ज्येष्ठ लेखक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकाविषयीचे विवेचन.

              ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या ‘ययाती’ या प्रसिद्ध कादंबरीवर गुरुवार, 25 जानेवारी 2024 रोजी लेखक सुनीलकुमार लवटे यांचे विवेचन.

              साहित्यिक जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहावर शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी  लेखक डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे व्याख्यान

              शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी विख्यात कवी ‘बा. सी. मर्ढेकरांच्या कविता’ या विषयावर ज्येष्ठ लेखक/ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ माहिती देतील.

              सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर काव्य समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांचे विवेचन.

              मंगळवार 30 जानेवारी 2024 रोजी साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या ‘जागर’ या वैचारिक लेखांच्या संग्रहावर लेखक विनोद शिरसाट विवेचन सादर करतील.

    ०००

    विरोधात निकाल, ओमराजेंचं वेट अँड वॉच; ठाकरेसेनेनं फिल्डींग लावली, ‘ऑपरेशन टायगर’ धोक्यात
    Nashik News : मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी, कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?
    श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५.९७ कोटींच्या विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed