Radha Mohan Mishra : काही वेळा तरुणीला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलले जात असे. विरोध केल्यास ‘आम्हीही हे सहन केले आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे,’ असे सांगून तिला गप्प केले जात होते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : खराडी येथील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासात संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारे तपशील समोर आले आहेत. पीडित तरुणीच्या पुरवणी जबाबानुसार, मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. अत्याचाराला ‘प्रसाद’ असे संबोधून तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबात केला आहे.
खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
महिला अनुयायीच शिक्षा ठरवत
सन २०१३ मध्ये उबाळेनगर येथील आश्रमात वास्तव्यास असताना महिला अनुयायीच पीडितेला शिक्षा देण्याचे प्रकार ठरवत असत. काम वेळेत पूर्ण न केल्यास ‘टेझर गन’चे शॉक, मेणबत्तीचे चटके आणि मारहाण केली जात होती. काही वेळा तिला विवस्त्र करून मिश्राच्या खोलीत ढकलले जात असे आणि विरोध केल्यास ‘आम्हीही हे सहन केले आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे,’ असे सांगून गप्प केले जात होते. Pune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट
घाणेरडे व्हिडिओ दाखवून अत्याचार
काही महिला अनुयायी मिश्राला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवत असत आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असत. अनेक प्रसंगी तिचे हात-पाय बांधण्यात आले, गुंगी आणणारी इंजेक्शने देण्यात आली; तसेच जबरदस्तीने मूत्र पाजल्याचाही दावा करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंचा आदेश येऊ दे, मग बघतो! माधुरी मांजरेकरांचा करारा जवाब
महिला आरोपींना एफआयआरपूर्वीच अटक?
या प्रकरणात अटक झालेल्या सहा महिला आरोपींनी ॲड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल केली आहे. या सहा महिला विविध न्यायालयांमध्ये वकिली करतात. या प्रकरणात पहाटे ‘एफआयआर’ची नोंद झाली; परंतु त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आल्याचा दावा या याचिकेत केला आहे. त्याला मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध दर्शविला. Romanch Mahajan : घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या लेकाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला, महाजन कुटुंबावर शोककळा याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून, आरोपींना जामीनासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज करण्याची मुभा दिली आहे; तसेच राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा