• Sat. Sep 21st, 2024
मुंबईतील सायनमध्ये वाहतुकीत मोठे बदल, कधीपासून वाहतूक बंद? ‘या’ मार्गांवर नो पार्किंग

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शीव येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल रेल्वेच्या सहकार्याने पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. हे पाडकाम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याने या पुलावरील वाहतूक २० जानेवारीपासून बंद करण्यात येत असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. रहदारीचा हा पूल पाडण्यात येणार असल्याने या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

पुलाची पश्चिम वाहिनी बंद केल्याने वाहतुकीचे बदल

– डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनी शीव जंक्शनवरील वाहतूक शीव सर्कल, शीव रुग्णालय जंक्शन येथून उजवे वळण घेऊन सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून कुर्ला व धारावीकडे – के. के.कृष्णन मेनन मार्ग (९० फूट) रोडने अशोक मिल नाका येथे उजवे वळण घेऊन जाता येईल.

– पश्चिम द्रुतगती मार्ग व वांद्रेकडे – सरळ संत कबीर मार्ग (६० फुट) रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन शीव-माहीम जोडरस्त्याने टी. जंक्शन येथून पुढे जाता येईल.

रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला कसा काय आला, काय सांगतो नियम जाणून घ्या…
– माहिमकडे – कुंभारवाडा जंक्शन येथून डावे वळण घेऊन माटुंगा लेबर कॅम्प – पुढे टी. एच. कटारीया मार्गे जाता येईल.

– डॉ. बी. ए. रोड उत्तर वाहिनीवरून येणारी वाहतूक शीव रुग्णालय जंक्शन येथून डावे वळण घेऊन सुलोचना शेट्टी मार्गे पुढे जाता येईल.

पुलाची पूर्व वाहिनी बंद केल्याने वाहतुकीचे बदल

– कुर्लाकडून हलकी वाहने पैलवान नरेश माने चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे संत रोहिदास मार्गे, अशोक मिल नाका येथे डावे वळण घेऊन पुढे के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फूट) रोडने कुंभार वाडा जंक्शन येथे डावे वळण घेऊन सुलोचना शेट्टी मार्गाने शीव रुग्णालय पूलमार्गे जाऊ शकतील.

– अवजड वाहने पैलवान नरेश माने चौकापूर्वी धारावी कचरापट्टी जंक्शन सिग्नल येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे शीव-वांद्रे जोडरस्ता, धारावी टी जंक्शन येथून पुढे जातील.

– पश्चिम द्रुतगती मार्ग व कलानगर जंक्शनकडून शीव-वांद्रे जोडरस्त्याने येणारी वाहतूक धारावी टी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन केमकर चौकात डावे वळण घेऊन संत कबीर मार्ग (६० फुट) रोडने कुंभारवाडा जंक्शन शीव रुग्णालय पूल (कुंभारवाडा पूल) मार्गे पुढे जाईल.

या मार्गांवर नो पार्किंग

– संत कबीर मार्ग (६० फूट) रोड – धारावी ओव्हर ब्रिज ते केमकर चौकापर्यंत.

– शीव-माहीम जोडरस्ता – टी जंक्शन ते माहीम फाटकपर्यंत.

– माटुंगा लेबर कॅम्प – कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेल.

– सुलोचना शेट्टी मार्ग – शीव रुग्णालय जंक्शन ते गेट क्र. ७ पर्यंत.

– भाऊ दाजी रोड – शीव रुग्णालय गेट क्र. ७ ते रेल्वे पूल.

– संत रोहिदास मार्ग – पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन

शीव-वांद्रे जोडरस्ता – वाय जंक्शन ते टी जंक्शन

– धारावी डेपो रोड – वाय जंक्शन ते कचरापट्टी जंक्शन (९० फूट) रोड – कुंभारवाडा जंक्शन ते अशोक मिल नाका.

फक्त एकच चेंडू ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट, नेमका सामना कुठे जिंकला जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed