• Sat. Sep 21st, 2024
राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, तरीही सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज

धुळे: अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील कारसेवकांनी खंत व्यक्त करत आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने अयोध्येत जाण्याची भावना व्यक्त केली आहे.
राम मंदिरात म्हैसूरच्या शिल्पकारांनी घडवलेल्या रामलल्लाची पाषाणमूर्ती होणार विराजमान
१९९० पूर्वी अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी संपूर्ण देशभरात जनजागृती सुरू होती. धुळे शहरात देखील विविध कार सेवकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत होती. यात चंद्रकांत शेळके यांचा सिंहाचा वाटा होता. राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यावेळी सव्वा रुपये जमवून वीट पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सजीव देखाव्यांच्या मधून राम मंदिराच्या उभारणीसाठी जनजागृती करण्यात आली होती. चंद्रकांत शेळके यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कारसेवक म्हणून काम केलं. चंद्रकांत शेळके यांनी १९९०आणि १९९२ मध्ये कार सेवक म्हणून सहभाग घेतला.

जरांगेंचं आंदोलन ही आग, त्यात हात घालाल तर भाजल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचं सरकारला आवाहन

उत्तर प्रदेशातील तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरिता दिसतात क्षणी गोळी घालण्याची पोलिसांना आदेश दिले. मात्र त्याचा थोडाही विचार न करता चंद्रकांत शेळके यांनी कार सेवकाची जबाबदारी समर्थपणे पार पडली. तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीला न जुमानता चंद्रकांत शेळके यांनी इतरांसमवेत कार सेवक म्हणून सहभाग घेतल्याने त्यांना तब्बल पंधरा दिवसांचा कारावास देखील भोगावा लागला. मात्र आज एकीकडे अगदी दिमाखात राम मंदिराचे उद्घाटन होत असताना कार सेवकांना अद्याप निमंत्रण आलेले नाही. ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिले त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, एवढीच अपेक्षा धुळ्यातील कारसेवक चंद्रकांत शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed