• Sat. Sep 21st, 2024
डोंबिवलीत एटीएम फोडताना चोरट्यांचा प्रयत्न फसला, आग लागली; २१.११ लाख रुपये जळून खाक

डोंबिवली : डोंबिवली पश्चिम परिसरात एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले रोडला असलेल्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान गॅस कटरच्या साहाय्याने फोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. एटीएम फोडताना एटीएम मशीनला आग लागली. मशीनला आग लागल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला.

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडताना मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन लागली. त्यानंतर मशीनला आग लागली. या आगीत मशीनसह एटीएम मशीनमधील २१ लाख ११ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक झाली.

कोकणवासियांनो जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचा इशारा
१५ जानेवारीच्या मध्यरात्री पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रोडला असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. एटीएम मशीन फुटत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर केला. गॅस कटरने मशीन कापत असताना गॅसमुळे मशीनला आग लागली. या आगीत मशीनमधील २१ लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली.

धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?

लोढा इमारतीला आग; पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळाल्या

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचं, त्यांचा तपास करण्यास आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी एटीएम मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. बी. देवरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed