• Mon. Nov 25th, 2024
    धक्कादायक! एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडली; मोठी रोकड लांबवत चोरटे पसार, तपास सुरू

    अमरावती: शहरात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. दहा दुकानांपैकी सहा दुकानांमधून मोठी रक्कम चोरी गेल्याची चर्चा दुकानदारांमध्ये होत आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घटनेत तीन जणांचा समावेश असून या प्रकारामुळे मात्र व्यापारीवर्गात दहशत निर्माण झाली आहे.
    आधी मुलाला निर्दयीपणे संपवलं; नंतर चेहरा विद्रुप केला अन् केस कापले, शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास तीन चोरटे बिझिलँडमधील मागील बाजूने प्रवेश करून आतमध्ये शिरले. साया फॅशन, राजतीलक, प्रीतम फॅशन, हार्दिक अनेक्स, साई कृष्ण अप्रल, ज्योती पाईप, व्यंकटेश बॅग्स, श्याम पारवा, साहेब कोटसूट, महाराजा फॅशन, बिझिलँड कार्यालयाची शटर लोखंडी रॉडने वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यामध्ये आठ दुकानांमधून ६५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सकाळी व्यापारी जेव्हा दुकानात पोहचले, तेव्हा त्यांना दुकानाचे शटर वाकलेले दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.

    शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? त्यांच योगदान काय ते त्यांनी सांगावं | नारायण राणे

    पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र त्यानंतर उर्वरित नऊ दुकानदारांनी सुद्धा तक्रार केल्याने मोठी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी श्वान पथक बोलावून चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला. दुकानाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तीन जणांचे चेहरे कैद झाले असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे आरंभली आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्ग चिंतेत असून पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed