• Sat. Sep 21st, 2024

जेलमध्ये जाऊन आल्यावर माणूस मोठा होतो, म्हणून मी जेलमध्ये गेलो, रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य

जेलमध्ये जाऊन आल्यावर माणूस मोठा होतो, म्हणून मी जेलमध्ये गेलो, रत्नाकर गुट्टे यांचं वक्तव्य

परभणी: मी जेलमध्ये गेलो याचं एकमेव कारण म्हणजे कुणाची तरी इच्छा पूर्ण करायची होती म्हणून गेलो. काही जणांची खूप इच्छा होती की मी जेलमध्ये जावे. मी जर गेलो नसतो तर ते थांबतच नव्हते. त्यांना मला जेलमध्ये पाठवायचे होते. त्याचबरोबर मला अनुभव होता की जेलमध्ये जाऊन आल्यानंतर माणूस मोठा होतो आणि मलाही जेल कशी असते याचा अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे मी स्वतः जेलमध्ये गेलो, असे धक्कादायक वक्तव्य गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
एकला चलो रे म्हणा… निवडणुकीत युती-आघाडी नको, स्वबळावर लढुया, मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना आग्रह
गंगाखेड येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलत होते. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणुकीमधून लढवली होती. गंगाखेड शुगरमधील शेतकऱ्यांच्या नावाने विविध बँकांमधून कोट्यवधी रुपयाचे कर्ज उचलल्याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांना जेलमध्ये जावे लागले होते. हे प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे आणि त्यांचे मेहुणे सध्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे होते. या दोघांनी मिळूनच गंगाखेड शुगर मधील तो घोटाळा उघडकीस आणला होता. रत्नाकर गुट्टे यांना या प्रकरणांमध्ये जेलची हवा खावी लागली होती.

माझ्या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे, रामदास फुटाणेंच्या कवितेवर शिंदेंचं प्रत्युत्तर

पुढे बोलताना आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की, मी माझ्या वकिलांना विचारले होते की मला किती दिवसात जमानत होईल. तेव्हा वकिलांनी सांगितले की तीन-चार महिन्यात तुम्ही जेलच्या बाहेर येऊ शकतात. त्यामुळे मी स्वतः निर्णय घेतला की आपण जेलमध्येच राहू आणि मी तीन महिने जेलमध्ये चांगल्या पद्धतीने राहिलो. जेलमध्ये देखील बऱ्याच आरोपींच्या जमानती करून देण्यामध्ये मी पुढाकार घेतला. आपल्याला माहीतच आहे की मी जेलमध्ये असताना देखील आपण सर्वांनी मला आमदार केले. त्यामुळे मला जो अनुभव होता की जेलमधून आल्यानंतर माणूस फार मोठा होतो. मी आमदार झालो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed