उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपला आम्ही त्यांच्या ढोंगामुळं सोडलंय, हिंदुत्त्व सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही ठिकाणी मदानाचा अधिकार वापरा, अशा जाहिराती लागल्याचं पाहिलं. त्याच्या जवळ कचरा साफ करा, अशी जाहिरात होती. राम मंदिराचा लढा कित्येक शतकांचा आहे, अनेक कारसेवकांनी रक्त सांडलंय. सुभाष देसाईंनी काल ४० ते ५० कारसेवक बोलावलेल्या बैठकीला होते. अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपशी शिवसेनेची युती होती. दलाली हिंदुत्त्व मला मान्य नाही. राम मंदिराचं लोकार्पण म्हणजे देशाच्या अस्मितेचं प्रतिष्ठापणा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलवायला काय हरकत आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. राष्ट्रपतींना नाशिकच्या काळाराम मंदिरात येण्याचं आमंत्रण दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आपण २२ तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यावर पंतप्रधानमहोदय काल तिथं जाऊन आले. मी २२ जानेवारीपूर्वी शिवनेरीला जाणार आहे. मोदींना आव्हान आहे की त्यांनी २२ जानेवारीपूर्वी शिवनेरीला जावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवनेरीतील शिवजन्मभूमीची मूठभर माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. त्यानंतरच्या एका वर्षाच्या आत राम मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लावला सरकारनं दिलेला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज सभेसाठी नाही शाखा भेटीसाठी आलेलो आहे. पक्ष चोरण्याचा प्रयत्न आला आहे. तुम्ही धनुष्यबाण चोरलंत ना, चोराच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसैनिकांच्या हातात मशाल होऊन जाऊदे, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. १० वर्षात देशाचं वाटोळं केलं गेलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
आमच्या घराणेशाहीविषयी आपल्याला बोलायचं असेल तर ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची, एका हिंदुत्त्वाच्या विचाराची घराणेशाही शिवसेना पुढं घेऊन चाललीय. गुलामीची, गद्दारीची घराणेशाही महाराष्ट्रात आणि शिवसेनेत चालणार नाही. आज मुख्यमंत्र्यांना काही काम राहिलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री कचरा काढत असल्याचं टीव्हीवर पाहिलं, आपल्याला त्यांचाच कचरा साफ करायचा आहे, असं राऊत म्हणाले. आपल्यासमोर लोकं बसलेत ती शिवसेना आहे. या शिवसेनेचा निकाल राहुल नार्वेकर देऊ शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला हात लावण्याची हिम्मत कुणाची नाही. कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. कल्याण डोंबिवलीत जिथं जिथं जाऊ तिथून लोकं बाहेर पडत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना कल्याण डोंबिवलीकरांच्या पाठिशी उभं राहिलं. गद्दारांना गाडण्याचं काम डोंबिवलीत झालंय हे दाखवून द्यायचंय,असं संजय राऊत म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News