• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज उद्घाटन झाले. हा जगातील १२वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे मुंबईच्या वाहतूकीत मोठा बदल होणार आहे. इतक नाही तर मुंबईचे नवी मुंबई, पुणे, गोवा आणि दक्षिणेकडील राज्यांचे अंतर कमी होणार आहे. शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची पायाभरणी डिसेंबर २०१६ मध्ये मोदींच्या हस्ते ठेवण्यात आली होती.

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १७ हजार कोटी रुपये खर्चून या जवळपास २२ किमी लांबीच्या सेतूची उभारणी केली आहे. त्यातील १६ किमीचा भाग समुद्रावर असून देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल ठरला आहे.

    वैशिष्टे

    २१.८ किमीचा सेतू त्यापैकी १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर

    देशातील सर्वात लांब सागरी सेतू

    मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त २० मिनिटावर

    अटल सेतूवरून १०० किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येणार

    अवजड वाहने, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर यांना वाहतुकीची परवानगी नाही

    अटल सेतूवरून एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल द्यावा लागले, तर परतीचा प्रवास असेल तर ३७५ रुपये

    बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील तर ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर

    पुलासाठी २१ हजार कोटी इतका खर्च

    दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करण्याची शक्यता

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *