• Mon. Nov 25th, 2024
    अशीही एक श्रद्धा! महिला साई भक्ताचं साई चरणी मोठं दान; स्वतःच फ्लॅटच साई संस्थानला दान

    शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरुन दान करतात. शुक्रवारी छतीसगड येथील साईभक्ताने साईबाबा संस्थानला स्वतःचा १८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट दान केला आहे. तीन दिवसांपूर्वी बेंगलोरच्या साई भक्ताने तब्बल अर्धा किलो वजनी २९ लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केला होता. आता साई भक्ताने फ्लॅट दान केल्याने साई बाबांवरील भक्तांचे प्रेम आणि श्रद्धा पुन्हा एकदा समोर आले आहे.
    अटल सेतुमुळे प्रवास होणार सुपरफास्ट; पण पूल संपताच सहन करावा लागणार मनस्ताप, कारण काय?
    गितिका सहानी रा. दिल्ली राजहरा, जि. बालोद (छत्तीसगड) यांनी त्यांचे मालकीचे मौजे शिर्डीमधील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २१ चे क्षेत्र ५१.०९ चौ. मी. ही मिळकत साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांना नोंदणीकृत दानपत्राद्वारे देणगी स्‍वरूपात दिली आहे. या मिळकतीची किंमत रक्कम रुपये १८ लाख २४ हजार इतकी आहे. याचे दानपत्र करून घेणे कामी साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे मालमत्ता विभागाचे प्रभारी अधीक्षक विठ्ठलराव बर्गे हे हजर होते. गितीका सहानी यांचेकडून या फ्लॅटची चावी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी स्विकारली.

    घराणेशाहीवर बोट, मतदानाचं आवाहन, पंतप्रधान मोदींचा तरुणांना कानमंत्र

    यावेळी दानशूर महिला साईभक्त गितिका सहानी यांचा साई संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांनी सत्कार केला. यावेळी मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्‍थित होते. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत आलेल्या साई भक्तांनी दहा दिवसात तब्बल १६ कोटी रुपये साईंच्या झोळीत दानस्वरूपी दिले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच २९ लाखांचा सुवर्ण मुकुट आणि १८ लाखांचा फ्लॅट साई भक्तांनी साई चरणी अर्पण केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed