• Sat. Sep 21st, 2024
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, स्थगितीचं कारण काय?

पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच कालावधी शिल्लक असल्याने पोटनिवडणूक घेण्यास स्थगिती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात आम्हीच मार्गदर्शक तत्वे जाहीर करू, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पुण्याचे तत्कालीन खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १५१ क नुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु, आयोगाने ही जबाबदारी पार न पाडल्याने कायद्याची पदवी घेतलेल्या पुणेकर सुघोष जोशी या तरूणाने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

आव्हाडांना भेटेपर्यंत अ‍ॅडमिट होणार नाही, कॅन्सरग्रस्त तरुणाचा हट्ट; आव्हाड म्हणतात, माझेच…
त्यावर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर ताशेरे ओढत पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्या विरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत रितीन राय, सिद्धार्थ झा, कुशल मोर आणि श्रद्धा स्वरूप या वकिलांनी सुघोषची बाजू मांडली. यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करु, ‘त्या’ कुटुंबांना एक-एक हजार द्या, प्रकाश आंबेडकरांची मोदींकडे मागणी
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. परंतु, ही स्थगिती केवळ निवडणूक घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही म्हणूनच दिली आहे. मी याचिकेद्वारे निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनीही आयोगाला विचारले, असा दावा सुघोष यांनी मटा शी बोलताना केला.

या प्रकरणावरील पुढील सुनावणीत पोटनिवडणूक घेण्याबद्दल मार्गदर्शक नियमावली जारी करण्यासंदर्भात न्यायालयाने कल दर्शविला, ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. ही याचिका दाखल करण्यामागचा प्रमुख हेतू, म्हणजेच कायद्याबाबत स्पष्टीकरण अणि अशाप्रकारची निवडणूक आयोगाची मनमानी पुन्हा होऊ नये हाच होता. त्याला यश मिळेल, याची खात्री आहे.

सुघोष जोशी, याचिकाकर्ता

परंपरेनुसार आमचाच हक्क, पुणे लोकसभा आम्हीच लढणार; पोटनिडणुकीबाबत बाळासाहेब थोरातांचा स्पष्ट संदेश


Read Latest Maharashtra Updates And
Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed