• Mon. Nov 25th, 2024
    कॉफी कॅफेचा फलक; मात्र आत भलतंच सुरू, पोलिसांना टाकला छापा, समोरील दृष्य पाहून सगळेच हादरले

    प्रियंका पाटील
    अहमदनगर: शहरातील तरुणांना अश्लील चाळे करण्यास कॅफे उपलब्ध करुन देणाऱ्या ६ कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पांर्टमेंट बनवून तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध केली जाते, अशा तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना प्राप्त झाली.
    कुरळप आश्रमशाळा अत्याचार प्रकरण; आरोपींना चार वेळा जन्मठेप, ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी शिक्षा
    यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांनी अहमदनगर शहरातील कॅफेची तपासणी करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि .दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दोन पथके नेमुन माहिती घेऊन अश्लिल चाळे करणारे जोडपे मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने दि. ०८ जानेवारी रोजी सावेडी उपनगरातील १) श्रीराम चौक, पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्डस कॅफे, २) कुष्ठधाम रोड येथील बाबाज कॅफे, ३) गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, ४) नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोरील झेड के कॅफे, अहिंसा चौक, बुरुडगांव रोड, इगलप्राईड कॉम्प्लेक्स मधील ५) गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील ६) रिजकिंग कॅफे अशा ठिकाणी जाऊन खात्री केली.

    आमदार बांगरांसमोर अनिल कपूर किंवा कुठलेही फिल्मस्टार कमी, आनंदराव जाधवांकडून तोंडभरुन कौतुक!

    तेथे तरुण मुल-मुली अश्लील चाळे करताना मिळून आल्याने कॅफे चालकास कॅफे चालविण्याचा परवान्याची विचारपुस केली. त्यांनी कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लाऊन कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी कम्पार्टमेंट बनवल्याने आरोपीं विरुध्द कारवाई करुन कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क)(क) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कॅफेमध्ये मिळून आलेल्या तरुण मुला-मुलींच्या पालकांना बोलावून त्याचे समक्ष तरुणांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed