• Mon. Nov 25th, 2024

    ‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    ‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. देशभरात निवडणुकीचा फिवर चढायला सुरवात झाली आहे. पुणे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवले आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांचे पुण्यातील दौरे वाढले आहेत. पुणे लोकसभेमध्ये मनसेचा पहिला खासदार निवडून आणण्यासाठी अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या फेऱ्या घेत आहेत.

    एकीकडे स्वतः राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पुणे मनसे मध्ये लक्ष घातलं आहे. कार्यकर्त्यांची आणि पक्षाची बांधणी देखील सुरू केली आहे. मात्र असा असताना देखील आता भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. स्वतः राज आणि अमित ठाकरे हे पुण्यातील मनसे वाढवत असताना भाजपने मनसेतील एक मोठी फळी भाजपत गेली आहे. मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचा पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी संवाद कार्यक्रमानंतर बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले

    पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी सातत्याने पुणे दौरे करत मनसेची पक्ष बांधणी करण्यावर भर दिला. एकीकडे अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये पक्षप्रवेश सुरू असताना आता पुणे मनसेला मोठा धक्का दिलेला आहे. मनसेचे पदाधिकारी असलेले मंदार बलकवडे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे मनसेचा मिशन पुणे लोकसभेला मोठा धक्का बसला आहे.

    पुण्यात भाजपाचा विजय होणार

    पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय होईल. ५१ टक्के मते घेऊन महायुतीचाच उमेदवार जिंकेल. गेल्या वेळेपेक्षाही मोठा विजय पुण्यात होईल, अशी योजना आम्ही तयार केली आहे, असे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात ४५ प्लस लोकसभा व २२५ प्लस विधानसभा जागांवर महायुतीचा महाविजय साकारणार आहे. यात भाजपाचे सुपर वॉरियर्स विजयाचे शिलेदार ठरतील.

    संक्रातीपासून महायुतीचे मेळावे

    संक्रांतीच्या पावनपर्वावर राज्यात १४ तारखेपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत. हे सर्व जिल्हास्तरीय मेळावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत. मार्च महिन्यात राज्याचा मेळावा होईल. महायुती बूथस्तरापर्यंत मतदान केंद्रस्तरापर्यंत तालुकास्तरापर्यंत एकत्रित आणि एकजुटीने जनतेपर्यंत जाईल.

    मनसे आणि शिंदे गट संभाव्य युतीवर राज ठाकरे योग्य वेळी भूमिका जाहीर करतील : संदीप देशपांडे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed