• Mon. Nov 25th, 2024

    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही – संजय राऊत

    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही – संजय राऊत

    धुळे: २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद झालेल्या सर्वच स्तरातील शहिदांना अभिवादन करत उत्तर महाराष्ट्रातील झंजावाताला सुरुवात करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी धुळ्यात स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर येथे दर्शनानंतर गोदातीरावर महाआरतीचे देखील आयोजन यावेळी २२ जानेवारी रोजी करण्यात आले असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
    बच्चा म्हणत अजितदादांची पुतण्यावर टीका; रोहित पवारांचे हटके प्रत्युत्तर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले…
    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यांना आम्ही उमेदवारी दिल्याचा पश्चाताप होत असल्याची खंत देखील राऊत यांनी बोलताना व्यक्त केली आहे. आकडा वाढवायचा म्हणून फक्त निवडणुका लढणार नाही. अशी भूमिका महाविकास आघाडीतर्फे घेतली जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले असून राज्यातील जवळपास २३ जागांवर शिवसेना ही कायम लढत आली आहे. २३ मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम आहे. परंतु जिंकलेल्या १८ जागा आमच्या कायम राहतील, असा विश्वास देखील यावेळी राऊत यांनी धुळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

    गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य केलं असता या वक्तव्याचा धुळ्यात संजय राऊत यांनी समाचार घेतला. त्या भूकंपात तेच गाडले जातील या शब्दात गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले आहे. शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेला लाथ मारली.

    ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही, मंत्री पदाची, आमदारकीची परवा करत नाही; भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

    एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. बाळासाहेबांचा विचार हा दिल्लीचा गुलाम कधीच झालेला नव्हता, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार गट आणि शिंदे गट शिवसेनेच्या जागा वाटपाचा निर्णय देखील दिल्लीत घेतला जाणार आहे. दिल्लीतील भाजपच्या हाय कमांडच्या हिरवळीवर त्यांना बसावे लागत आहे. परत येताना तेथील हिरवळीचे गवत त्यांच्या मागील भागास चिकटून परत यावं लागत असल्याची टीका यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *