• Sat. Sep 21st, 2024
मित्राकडे गुटख्याची मागणी; नकार दिल्याने उफाळला वाद, रक्तरंजीत शेवटानं परिसरात खळबळ

जालना: जिल्हा सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात मित्रा-मित्रांमध्ये झालेला वाद, शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. या मारामारीत २३ वर्षीय दिलिप हरिभाऊ कोल्हे या तरुणाची हत्या झाली आहे.
चिमुकलीचे अपहरण; पोलिसांचे शोधकार्य, तपासाचे धागेदोरे भिकारी महिलेपर्यंत पोहोचले, चौकशीत धक्कादायक सत्य समोर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद लक्ष्मण शेळके याने खाण्यासाठी गुटख्याची पुडीची मागणी केली. शाब्दिक वाद वाढतच गेला आणि त्याचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे यांच्या छातीत अरविंद लक्ष्मण शेळके याने चाकू भोसकला. त्यानंतर अरविंद लक्ष्मण शेळके आणि त्याचे तीन ते चार साथीदार फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे चार ही मित्र दारू प्यायलेले होते असे समजते. जखमी युवक दिलीप कोल्हे यास गावकऱ्यांनी जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता दाखल केले आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती चंदनझीरा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

माधुरी दिक्षित निर्मित पंचक; कलाकारांनी सांगितल्या कोकणातल्या आठवणी

मात्र या झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जालन्यात सध्या लुटमारीच्या घटना तसेच खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात विशेष करून जालना शहरात गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले असून सर्वसामान्य नागरिकांना आता शहरात संचारण्यात सुद्धा भीती वाटत असल्याचे व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed