• Sat. Sep 21st, 2024
कोल्हापुरात पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर हातोडा

कोल्हापूर: जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडावर लागून असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पावनगडावर अनधिकृतपणे मदरसा चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने रात्रीपासून पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पावनगडावर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही कारवाई रात्रीपासून सुरू करण्यात आली असून अद्याप ही कारवाई सुरू आहे.

पन्हाळगडावर आक्रमण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाला लागूनच पावनगडाची उभारणी केली. मात्र याच ऐतिहासिक पावनगडावर अनधिकृतपणे मदरसे सुरू असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. यानंतर प्रशासनाने याची दखल घेत तपासणी केली असता गडावर या मदरशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार यासह परिसरातील ४५ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले. यानंतर काल रात्रीपासून प्रशासनाकडून प्रशासनाने हा मदरसा हटवण्याची कारवाई सुरू केली असून पावनगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून…
प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यापूर्वी या मदरशामध्ये असलेल्या सर्व मुलांना इतरत्र हलवण्यात आले असून रात्री दोनच्या सुमारास या कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. यानंतर अतिक्रमण काढलेला मलबा उचलण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. तर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पावनगडावरील रहिवाशांना देखील बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पावनगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी देखील बंदी घालण्यात आली आहे. सध्या गडावर १४४ कलम लावण्यात आलेला आहे त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मारहाण करायची नव्हती, पण एमडींच्या ड्रायव्हरने आगावपणा केला अन् हा प्रकार घडला; सतेज पाटील गटाचं स्पष्टीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed