• Sat. Sep 21st, 2024
रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार गावात, कार्यकर्त्यांकडून सडलेली पिके देऊन सत्कार, कारण काय?

परभणी: गोदा काठच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे स्वागत सोनपेठ तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने सडलेली पिके देऊन करण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील पिकांची परिस्थिती या वर्षी अतिशय बिकट असून यावर्षी तालुक्यात सरासरीच्या पन्नास टक्के ही पाऊस झाला नाही. तालुक्यातील पिकांची आणेवारी पन्नास टक्के पेक्षा कमी आली आहे. यावर्षी सोयाबीन कापूस या पिकांना सरासरी पेक्षा ही कमी भाव मिळत आहे.
जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य वादात; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले – बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ
सोयाबीन या पिकाला तर गेल्या वीस वर्षांपूर्वी इतकाच दर मिळत आहे. कापसाचे भाव देखील पाच हजारांनी घटले आहेत. त्यातच गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे उभ्या कापसाचे व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटानी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी गोदाकाठच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या खासदार संजय जाधव तसेच आमदार सुरेश वरपुडकर यांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सडलेले कापूस सोयाबीन आणि इतर पिके भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

६०० ते ७०० एकरावर गाजराची शेती, कवलापूर गाजराला महाराष्ट्रासह कर्नाटकातही मागणी

शेतकरी संघटनेतर्फे अशा पद्धतीने स्वागत केल्यानंतर आमदार खासदारांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात सभागृहात विषय मांडणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे, माधव जाधव, सोमनाथ नागूरे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed