• Sat. Sep 21st, 2024

कुख्यात आरोपींची माहिती ‘क्लिक’वर; CMISद्वारे पोलिसांना मिळणार दिशा, कसा होणार फायदा?

कुख्यात आरोपींची माहिती ‘क्लिक’वर; CMISद्वारे पोलिसांना मिळणार दिशा, कसा होणार फायदा?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एका भागातील गुन्हेगार किंवा आरोपीचा दुसऱ्या भागात शोध घेणे आगामी काही दिवसांत शक्य होणार आहे. सीएमआयएस (क्रिमीनल मॅनेजमेंट इंटेलिजेन्स सिस्टम) या अॅपच्या माध्यमातून अशा आरोपींची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे अशा गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाई करणे सोपे होत आहे. शहर पोलिसांनी सीएमआयएस या संकेतस्थळावर आतापर्यंत १४ हजार ७६० आरोपींची माहिती भरलेली आहे. संकेत स्थळांवर या आरोपींची माहिती एक क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत सीएमआयएस हे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. सीएमआयएम हे मोबाइलवरही उघडता येणार आहे. या सॉफटवेअर मध्ये मालाविषयक, शरिराविषयक, जुगार, वाळू व दारू विषयक आरोपी, गुन्हेगार, फरार, पाहिजे याची अद्ययावत माहिती प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी ही आधुनिक यंत्रणा अंमलात आणली जात आहे.

या तंत्रज्ञानात १४ हजार ७६० आरोपींची माहिती भरण्यात आली आहे. या माहितीमध्ये आरोपींवर असलेले गुन्हे, त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती देण्यात आली आहे. यामुळे नाकाबंदी किंवा विशेष तपास अभियानाद्वारे आरोपींची माहिती अॅपवर उपलब्ध होत आहे. ही माहिती अनेक पोलिसांनी डाउनलोड केलेली आहे. सीएमआयएसमध्ये अजुनही गुन्हेगारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई शक्य होणार आहे.
ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; दारु, अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त
अशी असेल माहिती

– गुन्हेगारांची यादी, सद्यस्थिती, इतर माहिती
– आरोपींची डिजिटल क्रिमीनल फोटो
– घटकनिहाय व गुन्हे पद्धतीची माहिती
– तडीपार गुन्हेगारांची माहिती
– फरार आरोपींची यादी

कारवाई करणे होणार सोपे

अनेकदा एका भागातील आरोपी हे दुसऱ्या भागात फिरत असतात. पोलिसांना माहिती नसल्याने त्याच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई करणे सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed