पुणे (पिंपरी) : समाज माध्यमांवर कधी कुठल्या गोष्टीची चर्चा होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण अनेक गोष्टींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या घटना पाहिल्या आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडमधील एका लग्न समारंभात चक्क मामाने भाचाला तब्बल १ हजार ३७५ गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला आहे. एवढं नाही तर त्याची इंडिया स्टार वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली आहे. त्यामुळे या भल्या मोठ्या पुष्प गुच्छाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. अनेक वेगवेगळे विक्रम करण्याचा छंद असणाऱ्या विक्रम हरके यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या नावावर तब्बल १८१ विश्व विक्रमांची नोंद आहे.
डॉ. हरके यांनी रविवारी (दि.३१) पिंपरी चिंचवड येथे त्यांचे भाचे चि. नीरज नवनाथ घोंगडे आणि चि. सौ. का. प्रतिक्षा प्रदीप उडगे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त १ हजार ३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. नीरजचे आजोबा सुरेश विश्वनाथ हरके यांच्या हस्ते हा विश्व विक्रमी गुच्छ आणि आजी संगीता सुरेश हरके यांच्या हस्ते इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र नववधू वरांना देण्यात आले.

यावेळी संयोजक डॉ. दीपक हरके, नवनाथ घोंगडे, ज्योती घोंगडे, अनिकेत हरके, विहान हरके, सुप्रिया हरके, रमेश कुदरी, सुमित कुदरी, स्वाती कुदरी आदींसह वधू वरांचे नातेवाईक उपस्थित होते. डॉ. हरके यांच्या संकल्पनेतून अहमद नगर येथील शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्सने हा गुच्छ सहा तासांत बनवला आहे.
अहमदनगर शहरात राहणाऱ्या दीपक हरके यांना असे विश्वविक्रम करण्याचा छंद जडला आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या १८१ विक्रमांची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या अनोख्या आणि वेगवेगळ्या विक्रमामुळे त्यांना फ्रान्स येथील थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सन्माननीय डिलीट पदवी प्रदान केली आहे.