• Sat. Sep 21st, 2024
पोहण्यासाठी चौघे पाण्यात उतरले, थोड्याच वेळात अनर्थ, गटांगळ्या खात एकाचा मृत्यू

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या शाहू नगर परिसरातील १३ वर्षीय चार मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जणांना वाचविण्यात यश आले, असून एका १३ वर्षीय मुलाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ईशान शेख वसीम (१३, रा. शाहू नगर) असं मयत मुलाचं नाव आहे.

जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख मोईन खान, अमीन खान (१३), अयान तस्लीम भिस्ती (१३) व असलम शेख सलाउद्दीन (१३) सर्व रा. शाहूनगर, जळगाव हे चौघे जण शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी चारही जण पाण्यात बुडत असल्याचं परिसरातील नागरिकांच्या लक्षात आलं. यातील मोईन खान, अयान भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तिघांना वाचवलं. मात्र, ईशानचा बुडून मृत्यू झाला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केलं.

संजोग वाघेरे ठाकरेंच्या शिवसेनेत, मावळ लोकसभेवर भगवा फडकवा, उद्धव ठाकरेंचे काम सुरु करण्याचे शिवसैनिकांना आदेश
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक यांनी तलाव परिसर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. यावेळी रुग्णालयात ईशानच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मयत ईशानचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. शेख दाम्पत्याला दोन मुली असून ईशान हा एकुलता एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा व बहिणींचा लाडका भाऊ गेल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Year Ender 2023: भारतात वर्षभरात धडकली ६ चक्रीवादळं, किती जणांचे बळी? किती हजार कोटींचं नुकसान?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed