• Mon. Nov 25th, 2024
    धक्कादायक! आधी वाद घातला, नंतर मित्रांच्या साथीने फळ विक्रेत्याला संपवलं, नेमकं प्रकरण काय?

    नागपूर: शहरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याची हत्या करण्यात आली. दोन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत फळ विक्रेत्याची हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश उमरे (५०, रा. चंदननगर) असे मृतकाचे नाव आहे. तर चेतन रमेश बगमारे (२२, रा. गुजरवाडी), चेतन पाटील (२३, रा. गुजरवाडी) अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
    माहेरातील पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या पतीवर काळाला घाला, चिमुकल्यांच्या रडण्यानं गाव हळहळलं
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसरात मृतकाचे फळांचे दुकान होते. यासोबतच मृतक खासगी वाहनांमध्ये प्रवासी पुरवत असे. त्याबदल्यात त्याला कमिशनही मिळत होते. बसस्थानकासमोरील शेतकरी भवनामागील मोकळ्या जागेत २ ते ३ स्वतंत्र खासगी पार्किंग आहे. यातील एक राजेश यादव याच्या मालकीचे असून चेतन बागमारे हा चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश प्रवाशांना गोळा करून पार्किंग जवळ उभे ठेवायचा. त्यांना घेण्यासाठी येणारी वाहनेही समोरच्याच ठिकाणी उभी करायची. त्यामुळे पार्किंगच्या जागेत पार्किंगसाठी येणारे वाहने लावणे आणि काढण्यातही अडचणी येत होत्या.

    खासदार सुप्रियाताई कंसात निलंबित; संजय राऊतांच्या टिपण्णीनंतर मंचावर एकच हशा

    याबाबत चेतन हा योगेशला सतत बोलत होता. मात्र योगेशवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे त्यांच्यात अनेकदा वादही होत होते. अखेर शुक्रवारी चेतनने त्याचा इतर मित्रांच्या मदतीने योगेशला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सायंकाळी योगेश पार्किंगच्या ठिकाणी येताच आरोपींनी त्याला घेरत योगेशवर धारदार हत्यारांनी हल्ला करायला सुरूवात केली. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed