• Sat. Sep 21st, 2024
लोखंडी जिन्याला हात लागल्याने अनर्थ, इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे : घराशेजारी असलेल्या लोखंडी जिन्यातून प्रवाहित झालेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात शनिवारी घडली. अलोक चकवे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव असून या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर भागातील पाटीलवाडी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चाळीत भगवान चकवे (३४) कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या घराला लागून असलेल्या लोखंडी जिन्याला हात लागल्याने अलोक याला विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अलोकला मृत घोषित केले. या घटनेनंतर मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या भागात असलेल्या विद्युत वाहिन्या खुल्या असल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

विनेश फोगाटला पीएमओमध्ये जाण्यापासून रोखलं; कुस्तीपटूने पुरस्कार कर्तव्य पथच्या फुटपाथवर सोडले
स्थानिकांच्या जीविताला खुल्या विद्युत वाहिन्यांमुळे धोका उदभवत असल्याचे सांगत याप्रश्नी महावितरणने तात्काळ कार्यवाही करुन मृत अलोक चकवे याच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी स्वप्निल महिंद्रकर यांनी केली. याप्रश्नी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकलेला नाही.
अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो; तुमचा आक्रोश देशभर पोचला- शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed