• Sat. Sep 21st, 2024
राममंदीर उद्घाटनावर संजय राऊतांची भाजपवर टीका, दिलीप वळसे-पाटलांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

सातारा: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हा सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेवूया, असा सल्ला सहकारमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना दिला आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांनिमित्ताने साताऱ्यात आले होते. संजय राऊत यांनी राममंदीर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली होती.
लोकसभेसाठी ठाकरे गट मैदानात; आदित्य ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार, तीन ठिकाणी सभा घेणार
भाजपने आता फक्त राम लल्लालाच निवडणुकीत उभं करायचं राहीलयं, अशी टीका केली होती. याबाबत वळसे पाटील यांना पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अजित पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला होता. यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, असं सांगत वळसे-पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.

घरी न बसता सगळ्यांनी आरक्षणासाठी मुंबईत यायचं, आपल्याला मुंबईतील तिन्ही मैदानं लागतील : मनोज जरांगे पाटील

दरम्यान जीगाव प्रकल्पात थेंबभर पाणी नाही. हे धरण अजून पूर्ण झालं नाही. मग ३३०० कोटींचं टेंडर कशासाठी? निव्वळ ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी आणि ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी ३३०० कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे. त्याबाबतही दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed