• Sat. Sep 21st, 2024
शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवला, रात्री हातपाय बांधले, चोरट्यांनी लाखोंचा कापूस लुटला

धुळे : शिरपूर येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शहादा-शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा कापूस लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी असलेले सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे आपल्या गावाजवळच असलेल्या शिरपूर शहादा रस्त्यावर शेतात काल रात्री आपल्या काढलेल्या कापसाची राखण करण्यासाठी म्हणून शेतात झोपण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांची जनावरे देखील शेतात बांधलेली होती. बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य व कापूस ठेवलेला होता. ते काल रात्री जेवण करून ते झोपून गेले. अचानक मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणानी त्यांच्या पलंगा जवळ येऊन पोटाला चाकू लावला व जागेवरून हलू नको, चाकूने भोसकून देऊ, अशी धमकी देत लाखो रुपयांचा कापूस लंपास केला.
…तर,जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा,सुनील केदारांवरील कारवाईनंतर काँग्रेसची मागणी
सुभाष बडगुजर ज्याठिकाणी झोपले होते त्या ठिकाणी आणखी दोन जण आले आणि पत्र्याच्या शेडमध्ये पडलेल्या दोरीने त्यांचे हातपाय झोपलेल्या स्थिती खाटीला बांधून ठेवले. आणि त्या चोरट्यांनी सोबत आणलेल्या गाडीत शेजारच्या पत्राच्या शेड मधील दहा ते बारा किंटल कापूस चोरून नेला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली असून, शिरपूर शहर पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
अजितदादा म्हणाले, लोकसभेत पाडणार म्हणजे पाडणार, अमोल कोल्हे यांनीही शड्डू ठोकला, म्हणाले…
अगोदरच दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावाने शेतकरी वर्ग हैराण झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग आता चांगलाच वैतगलेला आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे १० ते १२ क्विंटल कापसाची चोरी केली असून, सुमारे सव्वा लाखाच्या जवळपास नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने यावेळी सांगितले. शिरपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर शहर पोलिसांन पुढे ह्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.
मविआचं बळ वाढणार, शरद पवारांनी सांगितली इंडिया आघाडीच्या बैठकीतली ‘अंदर की बात’, म्हणाले…

कधी दुष्काळ ओला तर कधी दमडी न हातावर, शेतकरी दिनादिवशी कवींनी व्यथा मांडल्या

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed