मात्र आता मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना माझ्या डोक्यात तसे आत्ताच काही नाही असं स्पष्ट सांगितलं आहे.
पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात माझ्या डोक्यात काहीच नाही. माझ्याकडून कोणतीही तयारी सुरू नाही. भारतीय जनता पक्षात इच्छा व्यक्त करणे आणि मला काय हवं याला काहीही महत्त्व नसतं. संघटनेच्या पातळीवर जो निर्णय घेतला जातो तो सर्वांनाच मान्य करावा लागतो. पक्ष सांगेल ते करेल माझ्या डोक्यात आत्ता तसे काही नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्या मोहोळांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जात होतं त्यांनीच आता लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनील देवधर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र मोहोळ यांच्याकडून कोणतीही तयारी नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा पुण्यात लोकसभेसाठी उमेदवार नक्की कोण याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे दुसरे इच्छुक सुनील देवधर यांनी मात्र आपण पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे म्हणत पुढे लोकसभेच्या जागेवर आपला दावा ठामपणे सांगितला आहे. यामुळे आता पुणे लोकसभेच्या जागेवरून पुणे शहर भाजपात अंतर्गतच कलह सुरू आहे का याच्या चर्चा आता सुरू झाले आहेत.