जानेवारीअखेरपर्यंत हे टोल नाके सुरू करण्याचे सूतोवाच गडकरी यांनी गोवा येथे झालेल्या बैठकीत केले आहे. यामुळे गोव्यात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागणार हे निश्चित झाले आहे.
गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या व संबंधित रस्ता प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर उर्वरित दोन ठिकाणीही टोल नाके सुरू केले जाणार आहेत. यामध्ये अलमोडमार्गे बेळगावला जाणाऱ्या महामार्गावर मोरे येथे व केरी या उर्वरित रस्ता प्रकल्पाची काम पूर्ण झाल्यानंतर टोल नाके सुरू होणार आहेत. त्यामुळे आता भविष्यात गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागणार हे निश्चित झाले आहे.
गोव्यालगतच्या राज्यांमधून प्रवेश करताना असलेल्या चार महामार्गांवर हा टोल आता भविष्यात द्यावा लागणार आहे. मुंबई-कन्याकुमारी, गोवा-हैदराबाद रस्ता कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. देशातील सगळ्यात मोठा असलेला विक्रमी खांबांचा मोपा लिंक रोड, बोरीपूल आणि वेस्टर्न बायपासला काणकोणपर्यंत मंजुरी देतानाच चोर्ला घाटातून साखळी ते खानापूरदरम्यान नव्या रस्ता प्रकल्पालाही गडकरी यांना हिरवा कंदील दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबतही त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते महामार्ग प्रकल्पावरून अधिकारी व ठेकेदार यांची हजेरी घेतली. जे प्रकल्प अपूर्ण आहेत ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून निधीची कुठेही कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News