• Sat. Sep 21st, 2024
सुरक्षा रक्षकांसोबत वाद, सहा जणांचा हल्ला, नंतर बालगुन्हेगारांचे धक्कादायक कृत्य, काय घडलं?

नागपूर: सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सहा बालगुन्हेगारांनी पलायन केले आहे. ही खळबळजनक घटना रविवारी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौकातील बालसुधारगृहात घडली. या घटनेने सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पलायन करण्यात आलेल्या सहाही जणांचे वय १७ वर्षे आहे.
वारंवार अपमानस्पद वागणूक; युवक कंटाळला, भावाला रस्त्यात गाठलं अन् धक्कादायक कृत्यानं पनवेल हादरलं
मिळालेल्या माहितीनुसार, सुधागृहात सध्या १५ बालगुन्हेगार आहेत. पलायन केलेल्या सहा बालगुन्हेगारांविरुद्ध चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सहा बालगुन्हेगारांना खोलीतून बाहेर काढण्यात आले. त्यांची मोजणी सुरू असताना काही गुन्हेगारांनी दोन सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालायला सुरूवात केली. त्यानंतर सहाही जणांनी दोन रक्षकांवर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केली. एका रक्षकाकडील चावी हिसकावली. कुलूप उघडून सहाही जण पसार झाले. रक्षकांनी लगेच अधिकाऱ्यांना माहिती दिली.

काँग्रेसविरोधात लढून आमदारकी मिळवली, मग भाजपला टक्कर दिली, पण काँग्रेससाठी संकटमोचक ठरलेला नेताच अडचणीत

एका अधिकाऱ्याने कपिलनगर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्यासह पोलिसांचा ताफा सुधारगृहात पोहोचला. पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि सुधारागृहातून पलायनाचा गुन्हा दाखल केला. पलायन करण्यात आलेल्या सहा पैकी दोन जण गोंदियातील रहिवासी असून प्रत्येकी एक जण कपिलनगर, हुडकेश्वर, कळमना आणि इमामवाड्यातील रहिवासी आहे. बाल गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली असून पोलीस गुन्हेगारांच्या निवासस्थानांसह, रेल्वे आणि बसस्थानक परिसरात त्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed