• Mon. Nov 25th, 2024

    येरवड्यात नऊ वर्षांच्या मुलीला विवस्त्र करुन मारहाण; मामीविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

    येरवड्यात नऊ वर्षांच्या मुलीला विवस्त्र करुन मारहाण; मामीविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : घरी कोणी नसताना महिलेने नणंदेच्या नऊ वर्षाच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करून तिचे मोबाइलमध्ये फोटो काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    मुलगी मूळ गावी आंध्र प्रदेशात गेल्यावर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुणे विमानतळ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. विमानतळ पोलिसांनी महिलेवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेचा पती हवाई दलात कर्मचारी आहे.

    काय घडलं?

    पीडित मुलीच्या आईने आंध्र प्रदेशातील मकुवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले, ‘करोना काळात फिर्यादी महिलेने नऊ वर्षांच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठविले होते. भाऊ हवाई दलात नोकरीला असल्याने हवाई दल वसाहतीत राहतो. पती कामावर गेल्यावर पत्नी नणंदेच्या मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करत होती. याशिवाय मुलीचे विवस्त्र फोटो मोबाइलमध्ये काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये आठ महिने प्रकार सुरू होता. काही काळानंतर मुलगी गावी गेल्यावर तिने मामाच्या घरी मामीने केलेला अत्याचार सांगितला.’ पोलिस निरीक्षक संगीता माळी पुढील तपास करीत आहेत.
    घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?
    पीडित मुलगी करोना काळात आंध्र प्रदेशातून पुण्यात मामाकडे राहण्यासाठी आली होती.आरोपी महिलेचा पती हवाई दलात नोकरीला आहे.पती नोकरीला गेल्यावर पत्नी नणंदेच्या मुलीला विवस्त्र करून मारहाण करून मोबाईल मध्ये फोटो काढत होती.पीडित मुलगी गावी गेल्यावर आईला घडलेला प्रकार सांगितला.त्यानतंर आईने स्थानिक पोलीस ठाण्यात भावाच्या पत्नी विरोधात तक्रार दाखल केली.विमानतळ हद्दीत सगळा प्रकार घडल्याने आंध्र प्रदेश पोलीसांनी गुन्हा दाखल करून ‘ शून्य ‘ क्रमांकाने विमानतळ पोलीस ठाण्यात पाठविला आहे.- संगीता माळी, पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed