• Sat. Sep 21st, 2024
धक्कादायक! लॉजवर भलतंच कृत्य; पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, धाड टाकताच समोरचं दृष्य पाहून…

धाराशिव: जिल्ह्यात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा टाकत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दलालासह लॉजचालक आणि मॅनेजरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीवर धाराशिव गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
धक्कादायक! पोटच्या लेकीला देह व्यापारात ढकलले; पैशासाठी जन्मदात्यांचे कुकर्म, ६ जण अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक आणि व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन लॉजवर छापा टाकला असता लॉजमध्ये चार महिला आढळून आल्या.

महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे (६३, रा. धाराशिव) दलाल बालाजी चंद्रकांत गवळी (२९, रा. धाराशिव) हे दोघे जण आणि लॉजचे मालक नितीन रोहीदास यांच्या सांगण्यावरुन त्या महिला असे करत असल्याचे समोर आले. यानंतर पथकाने या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ऑटोरिक्षा, रोख रक्कम १६,१३० आणि निरोधची पाकीटे असा एकूण ७१,१३० रुपयांचा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोंपींविरुद्ध ३५२/२०२३ भा.दं.वि. सं. कलम- ३७०, ३७० (अ) (२), ३४ सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- ३, ४, ५ अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

कचरा उठाव नियोजनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस हवालदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार साईनाथ आशमोड, योगेश कोळी, रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार भोसले, अरब यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed