• Sat. Sep 21st, 2024
मराठा आरक्षणासाठी चौथा बळी; परभणीत तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबाचा आक्रोश

परभणी: मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र अद्याप तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आता चौथा बळी गेला आहे.
बाप रे बाप! बाईंनी शाळेत आणला साप; मुलांच्या गळ्यात टाकून फोटो काढले, स्टेटस ठेवले अन् मग…
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील मौजे.पुंगळा येथील नितीन गोविंदराव जगताप (५५) रा. पुंगळा येथील तरुणाने बुधवारी राहत्या घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून जिंतूर तालुक्यातील एकापाठोपाठ एक अशा तीन मराठा समाजाच्या तरुणांनी आपली जीवन यात्रा संपवली. आता हा मराठा आरक्षणाचा चौथा बळी ठरला आहे. गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांची बैठक सुरू होती. यावेळी सदरील तरुणांनी आक्रमकपणे आपले मनोगत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी व्यक्त केले होते. यावेळी अनेकांनी आरक्षण आज ना उद्या भेटेल, अशी त्याची समजूत काढली होती.

१३६ दिवस, २७ देश, ३० हजार किमी प्रवास; मुंबई ते लंडन दुचाकीवरून फिरणारा अवलिया

परंतु सरकार हे आडमुठी भूमिका घेत असून आपल्याला आरक्षण हे भेटले पाहिजे, असा त्यांनी मनात राग धरत तो त्या ठिकाणाहून निघून गेल्याची प्राथमिक माहितीमध्ये गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याच मानसिक तणावातून घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेचा पोलीस पंचनामा दिनेश येवले पोलीस उपनिरीक्षक, दत्तात्रय गुगाणे पोलीस जमादार, उमेश चव्हाण यांनी केला. दरम्यान त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉ. काळे यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी रुग्णालय परिसरात मराठा समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed