७० वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्याने आपल्या ३९ वर्षीय सहकारी महिलेला ”पप्पी दे”, म्हणत तिचा विनयभंग केला आहे. हा सगळा प्रकार १३ डिसेंम्बर रोजी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान पुण्यातील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे घडला आहे. या प्रकरणी ७० वर्षीय वयोवृद्ध म्हाताऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राजीव विनायक विळेतकर (वय ७० रा, प्रभात रोड गल्ली नंबर १५ डेक्कन पुणे) यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसासर, फिर्यादी महिला या महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे असिस्टंट क्युरेटिव्ह म्हणून गेले १२ वर्ष काम करत आहेत. त्यांची कामाची वेळ ही सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. त्याठिकाणी इतर तीन कर्मचारी काम करतात पण ते येऊन जाऊन असतात आणि त्याच ठिकाणी संग्रहालयाचे कार्यकारी सचिव आरोपी राजीव विनाक विळेतकर हा काम करतो.
१३ डिसेंबर रोजी नेहेमी प्रमाणाने फिर्यादी महिला या कामावर आल्या. आरोपी देखील ११ वाचेच्या सुमारास कामावर आला. आरोपी ऑफिसमध्ये आल्यानंतर बराच वेळ फोनवर बोलत होता. ते झाल्यानंतर त्याने त्याच्या टेबल मागील खिडकीचे पडदे लावले आणि अचानक पणे फिर्यादी यांच्याजवळ गेल्याने फिर्यादी या उभ्या राहिल्या. त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादीला जवळ ओढलं आणि म्हणाला ”मला एक पप्पी दे”, त्यावर पीडित महिलेने नकार दिल्याने आरोपी फिर्यादीला म्हणाला ”तुला प्रॉब्लेम असेल तर सांग, मी दरवाजा लावून घेतो”, असं बोलून पीडित महिलेवर जबदरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी आरोपीला ढकलून तिथून घरी जाण्यासाठी पळ काढला आणि वाटेत भेटलेल्या मैत्रिणीला सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर हा सगळा प्रकार संस्थेने ट्रस्टला सांगितला आणि याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.