• Mon. Nov 11th, 2024

    अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडलं, अपघाताची भीषणता एवढी की पाचशे फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली, आणि…

    अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडलं, अपघाताची भीषणता एवढी की पाचशे फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली, आणि…

    बुलढाणा : रस्ते अपघातात, दुचाकी अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

    बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पूलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    दोन वर्षापासून फरार होता, रिवॉल्वर घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि तिथेच गेम झाला…!
    शहरातील गाडेगाव मोहल्ल्यातील रहिवासी वीरेंद्रसिंह संग्रामसिंह राठोर (४०), योगेश रवींद्र टप (२५) हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक दुचाकीने शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर होते. राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पूलाजवळ मलकापूर शहरात येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडलं. अपघात इतका गंभीर होता, की अज्ञात वाहनाने अक्षरशः पाचशे फुटांपर्यंत दुचाकी फरफटत नेली अन् पोबारा केला.

    मतदान महाराष्ट्रात पण नकाशावरुन गायब असलेल्या गावाची गोष्ट,गावकऱ्यांकडे ना सातबारा, ना रस्ता,चित्र कधी बदलणार?

    कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं मराठा आरक्षण देण्यासाठी जे करता येईल ते करणार ; शिंदेंची विधानसभेत घोषणा

    या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनेत वीरेंद्रसिंह संग्रामसिंह राठोर याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला, तर गंभीर जखमी योगेश टप याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं. ही घटना घडल्यानंतर गाडेगाव मोहल्ल्यातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed