छत्रपती संभाजीनगर : विमानतळावरून देशातंर्गत विविध शहरांकडे जाणारे अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून तीन लाख ४४ हजार विमान प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमान प्रवाशांच्या संख्येत ५३.६ टक्क्यांनी वाढल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगरूळू या चार शहरांसाठी विमान सेवा सध्या सुरू आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमान कंपनीकडून विमान प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. विमान कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि दिल्लीला जाण्यासाठी ए ३२० हे विमान उपलब्ध करून दिले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातून उपलब्ध असलेले विमान देशातील चार प्रमुख शहरांशी जोडण्यात आले आहे. या चारही शहरांतून देशाअंतर्गत आणि विदेशात जाण्यासाठी विमान उपलब्ध होत आहे. यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे.
राज्यभरातील प्रवाशांची संख्या
असे आहे विमानांचे वेळापत्रक
विमान क्रमांक मार्ग आगमन दिवस
नगरसह अन्य शहरांसाठी हवी सुविधा
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगरूळू या चार शहरांसाठी विमान सेवा सध्या सुरू आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमान कंपनीकडून विमान प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. विमान कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि दिल्लीला जाण्यासाठी ए ३२० हे विमान उपलब्ध करून दिले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातून उपलब्ध असलेले विमान देशातील चार प्रमुख शहरांशी जोडण्यात आले आहे. या चारही शहरांतून देशाअंतर्गत आणि विदेशात जाण्यासाठी विमान उपलब्ध होत आहे. यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे.
छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाडा आणि खान्देशच्या काही भागातून प्रवासी विमान प्रवाशांसाठी शहरात येत असतात. यामुळे गेल्या काही वर्षांत विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे.
मागील सात महिन्यांची प्रवासी संख्या
महिना | वर्ष २०२३ | वर्ष २०२२ |
ऑक्टोबर | ५०,३६१ | ३०,४७१ |
सप्टेंबर | ५०,०५० | ३०,४४३ |
ऑगस्ट | ५२,६५७ | २९,६९२ |
जुलै | ५२,२३६ | ३३,३९७ |
जुन | ४२,२६५ | ३३,७३५ |
मे | ४९, २३० | ३८,७६८ |
एप्रिल | ४७,३३८ | २७,४७३ |
राज्यभरातील प्रवाशांची संख्या
विमानतळ | वर्ष २०२३ | वर्ष २०२२ |
मुंबई | २,१७,६३,९८५ | १,७३,३०,७६६ |
नागपूर | १६,०४,६४२ | १३,०२,०६१ |
पुणे | ५४,०४,६२२ | ४०,८७,२१७ |
शिर्डी | ३,७७,१०२ | ४,१९,३१९ |
छत्रपती संभाजीनगर | ३,४४,१३२ | २,२३,९७९ |
नाशिक | १,२९,७४८ | ५२,७१४ |
कोल्हापूर | ८९,५०९ | ६९,२१६ |
सोलापूर | ३९५ | ४२ |
नांदेड | ३७९ | १८४ |
जळगाव | ३५२ | १६७ |
(वरील सर्व प्रवाशांची संख्या ही देशांतर्गत आहे. यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवासीसंख्या जोडलेली नाही)
असे आहे विमानांचे वेळापत्रक
विमान क्रमांक मार्ग आगमन दिवस
- ६ई५६७ मुंबई ते छत्रपती संभाजीनगर ६.१५ आठवड्यातील सर्व दिवस
- एआय४४३ दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर ६.४५ आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई७२५२ हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगर ८.०० आठवड्यातील सर्व दिवस
- एआय४९९ मुंबई ते छत्रपती संभाजीनगर ८.१० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई७१५६ हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगर १६.१० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई५६०३ दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर १७.१० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई५३९२ औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर १७.५० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई ५१६ बेंगरूळू ते छत्रपती संभाजीनगर १८.३० मंगळवार, गुरुवार
- ६ई ५१६ बेंगरूळू ते छत्रपती संभाजीनगर १५.३५ शनिवार
विमान क्रमांक मार्ग आगमन दिवस
- ६ई६५६९ छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ७.०५ आठवड्यातील सर्व दिवस
- एआय४४४ छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली ७.४० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई७२५९ छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद ८.२० आठवड्यातील सर्व दिवस
- एआय४०० छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ८.५० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई७१५७ छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद १६.४० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई५६०४ छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली १७.४० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई५३८३ छत्रपती संभाजीनगर ते मुंबई १८.२० आठवड्यातील सर्व दिवस
- ६ई ५१७ छत्रपती संभाजीनगर ते बेंगरूळू १९.०० मंगळवार, गुरूवार
- ६ई ५१७ छत्रपती संभाजीनगर ते बेंगरूळू १६.०५ शनिवार
नगरसह अन्य शहरांसाठी हवी सुविधा
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सध्या विमान प्रवाशांची संख्या चांगली आहे. या विमानतळावरून अधिकाअधिक प्रवासी वाढावे. यासाठी नगरसह अन्य शहरांसाठी विमान उपलब्ध झाल्यास ही संख्या वाढेल. अशी मागणी ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून केली जात आहे.