• Sat. Sep 21st, 2024

Ahmednagar Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रक कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू

Ahmednagar Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रक कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू

अहमदनगर : नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ मोठा अपघात झालाय. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. मालवाहतूक ट्रक कारवर कोसळल्याने कारमधील चौघे जण जागीच मृत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेनंतर ट्रकचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाहीय. पोलिसांचं ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ वाजेच्या दरम्यानमध्ये संगमनेर तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झालेला आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान चिमुकल्याचा समावेश आहे. तर एक महिला जखमी झालेली आहे. सध्या सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. हा अपघात कोणत्या कारणास्तव किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास करु किंवा जी महिला जखमी आहे तिचा जबाब नोंदवू. त्यानंतर, जो ट्रकचालक फरार झालेला आहे त्याचा शोध घेतल्यानंतर यात कुणाची चुकी आहे, हे निष्पन्न होणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करुन संपूर्ण तपास करणार आहेत.

अपघातातील मृत व जखमी अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावातील आहेत. आशा सुरेश धारणकर (वय ४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) व ओजवी धारणकर (वय २ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर अस्मिता अभय मिसाळ (वय ४०) या जखमी झाल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

पुण्याहून संगमनेरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून जाणारा मालवाहू ट्रक सर्व्हीस लेनवरून जाणाऱ्या कारवर पलटी झाला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व डोळासणे महामार्ग पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. हा अपघात नेमका कसा झाला, याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.

दहा वर्ष यांची गल्लीपासून दिल्लीत सत्ता पण त्यांना टीका करायला शरद पवार लागतात, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed