• Sat. Sep 21st, 2024

जरांगेंचं एका गोष्टीसाठी अभिनंदन पण ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण नको: रामदास कदम

जरांगेंचं एका गोष्टीसाठी अभिनंदन पण ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण नको: रामदास कदम

रत्नागिरी : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी तारखा धमक्या इशारे न देता या मराठा समाजाला कसा न्याय मिळेल हे पाहिले पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले. जरांगे काही अतिरेकी नाहीत आणि तुम्ही शासनाच्या पोटावरती चाकू ठेवून बोल आता देतोयस की नाही मराठा आरक्षण अशी भूमिका घेऊ नये, असं कदम म्हणाले. ही शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे हे समजून घ्यायला हवं असेही मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं.

आम्हाला ओबीसी मधून आरक्षण न घेता मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवं आहे, अशी भूमिका शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला हात लावणार नाही असे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेत उगाचच मोर्चा काढण्यात अर्थ नाही हे समजून घेतलं पाहिजे.

मनोज जरांगेंनी थांबायला हवं, भुजबळ यांनीही थांबलं पाहिजे. एकामेकांना अरे तुरे अशी भाषा करण्यापेक्षा कुठेतरी आपण सामंजस्याची भूमिका घेऊन थांबलं पाहिजे. मोर्चे काढून महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण सामंजस्याची भूमिका मांडली पाहिजे, असं कदम म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात आम्हाला ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण न घेता ५० टक्के पेक्षा जास्त कसे देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आमदार योगेश कदम यांनी विधिमंडळात या संदर्भात भाषण केलं आहे आणि महाराष्ट्र राज्यात आर्थिक सर्वे करायला लागेल. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे ही गोष्ट आपण माननीय सुप्रीम कोर्टाला जेव्हा पटवून देऊ त्या दिवशी आपल्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा आरक्षण मिळेल. या विषयात तुम्ही महाराष्ट्र शासनाला धमक्या देऊ नका लक्षात ठेवा आम्ही पण मराठेच आहोत असे रामदास कदम म्हणाले.
दहा वर्ष यांची गल्लीपासून दिल्लीत सत्ता पण त्यांना टीका करायला शरद पवार लागतात, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांचे अभिनंदन आहे त्यांच्यामुळं मराठ्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या शोधून काढल्या गेल्या. तुम्ही चांगलं काम केलं असं कौतुक रामदास कदम यांनी केलं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता नये तुटेपर्यंत ताणता कामा नये अशीही सामंजस्याची भूमिका त्यांनी मांडली.
भीमा कोरेगावला येणाऱ्या लोकांसाठी जेवणावळी नको, ‘बार्टी’चा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच वापरा : वंचित
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे याची जाणीव ठेवावी, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. या विषयात सारख्या तारखा देणे हे चुकीचं आहे, असे स्पष्ट मत कदम यांनी व्यक्त केलं. तामिळनाडू राज्याने जसं आरक्षण दिलं आहे तसेच आपल्यालाही सुप्रीम कोर्टात जाऊन ५० टक्क्यांपेक्षा अधिकच आरक्षण मागावं लागेल. हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल. ओबीसी समाजाच्या कोणत्याही आरक्षणाला हात न लावता वेगळं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. ही शासनाची भूमिका मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याचं कदम यांनी सांगितलं.
Ahmednagar Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ट्रक कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed