• Sat. Sep 21st, 2024

लै भारी भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, शरद पवारांचा विरोधकांना डोस

लै भारी भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, शरद पवारांचा विरोधकांना डोस

पुणे : राज्याचे राजकारण ज्यांच्याभोवती फिरत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजही त्याच जोमाने राजकारणात काम करत आहेत. शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने आज पुण्यातील खेड तालुक्यात “साहेब केसरी” बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी विरोधकांना घाम फोडणारे वक्तव्य केले. माझे वय झालेले नाही, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात असल्याचे सांगत लोकसभा आणि विधानसभेला तयार असल्याचेच त्यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “साहेब केसरी” बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल कोल्हेंची अजित पवार गटावर जोरदार टीका; म्हणाले- डरकाळी फोडणारे कधी दिल्लीला प्रश्न विचारणार नाहीत
यावेळी शरद पवार म्हणाले की, “माझी एक तक्रार आहे. सगळ्यांच्या भाषणात मी ८३ वर्षांचा झालो, ८४ वर्षांचा झालो असे बोलले जाते. पण तुम्ही अजून माझं काय बघितलंय. मी म्हातारा झालेलो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काहीच चिंता करु नका, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना जणू इशाराच दिला आहे.

आजच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. मात्र, आता आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत, यासाठी बळीराजाची साथ महत्वाची आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यत पहाण्याचा अनुभव देखील घेतला.

मी तेव्हा संसदेत ठणकावून सांगितलं, परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, पण निर्यातबंदी केली नाही: शरद पवार

शरद पवार यांचं ट्विट

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील ‘मी सेवेकरी सोशल फाउंडेशन’चे अध्यक्ष सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त केळगांव- चऱ्होली (खुर्द) येथे दि.१३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान ‘साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे’ आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या अंतिम लढती पाहण्यासाठी आज त्या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने ग्रामीण अर्थव्यवस्थेला संजीवनी देणाऱ्या व ग्रामीण संस्कृतीचे भूषण असणाऱ्या स्पर्धा पुन्हा सुरु झाल्याचे विशेष आनंद आहे; मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मी म्हातारा झालो नाही, तुम्ही चिंता करू नका; शरद पवारांनी समर्थकांना बळ दिलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed