• Sat. Sep 21st, 2024

सख्ख्या भावानं पैशासाठी बहिणीला फसवलं; पोलीस पाठीराखे बनले अन् महिलेला न्याय मिळवून दिला

सख्ख्या भावानं पैशासाठी बहिणीला फसवलं; पोलीस पाठीराखे बनले अन् महिलेला न्याय मिळवून दिला

नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं सोनं देण्यासाठी भावाने चक्क नकार दिला. एवढचं काय तर दागिन्यांमुळे बहिणीसोबत असलेलं नातं देखील भावाने तोडून टाकलं. शेवटी दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या मदतीने बहिणीला आपल्या हक्काचं सोनं मिळालं.
अमरावतीत फिल्मी स्टाईल थरार! व्यवहाराचे पैसे बाकी; वसूलीसाठी टोळक्यानं व्यापाऱ्याला रस्त्यात अडवलं अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रशांत उत्तरवार ह्या तेलगंणा राज्यातील आदिलाबाद येथील रहिवासी आहे. त्यांचं माहेर हे नांदेड येथील आहे. त्यांना दोन मुली देखील आहेत. २०१३ मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षण आणि भविष्यासाठी २० तोळे सोनं खरेदी केले होते. त्यानंतर संगीता उत्तरवार यांनी वडील मधुकरराव किशनराव पारसेवार हे हयात असताना त्यांच्या वजीराबाद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँक लॉकरमध्ये हे २० तोळ सोनं ठेवले. वडिलांच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोनं सुरक्षित असल्याच त्यांना वाटत होते. पण एप्रिल २०२१ मध्ये मधुकरराव पारसेवार यांचं निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर नॉमिनी म्हणून त्यांचा मुलगा दत्ता पारसेवार यांना बँकेच्या लॉकरचा ताबा देण्यात आला.

संगीता उत्तरवार यांनी आपल्या भावाला लॉकरमधील सोनं देण्याची विनंती केली. पण संपतीच्या उन्मादात आलेल्या भावाने सोनं गहाळ झाल्याचे सांगितले. याच कारणावरून भाऊ आणि बहिणीमध्ये नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे भावाने आपल्या बहिणीला घरी येण्यास मज्जाव केला. दोन वर्षानंतर बहीण भावामधील हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. संगीता उत्तरवार यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पीडित महिलेच्या भावाला तात्काळ ताब्यात घेतले.

लालाची उधळण, चांगभलंचा जयघोष; म्हसवडमधील रथोत्सवाची नयनरम्य दृश्य

तुझी बहीण विधवा आहे. काबाडकष्ट करून त्या आपल्या मुलींना उच्च शिक्षण देत आहे. तिला आधार दे, अशी अशी समज दिली. सोनं परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षकांनी दिला. त्यानंतर दत्ता पारसेवार यांनी तात्काळ बँकेच्या लॉकरमधील २० तोळे सोनं बहिणीला परत दिले. पोलिसांच्या मध्यस्तीने सोनं मिळाल्यानंतर उत्तरवार कुटुंबीय भारावून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed