• Mon. Nov 25th, 2024
    पैसे परत मिळवण्यासाठी तरुणांची अजब शक्कल; आधी वाटेत गाठून मारहाण नंतर…, अमरावतीत काय घडलं?

    अमरावती: जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमरावती येथील व्यापाऱ्यास भरदिवसा मारहाण करून त्यांच्याजवळील १ लाख १० हजारांची रोकड लुटण्यात आली. दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतील सावळा गावानजीक घडली. या प्रकरणी पाच लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
    आधी आजारांनी ग्रासलं, नंतर मित्रांनी हिणवलं; मात्र शेतकऱ्याने पैजेचा विडा उचलत गाठलं यशोशिखर
    मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील व्यापारी इमरान चाउस अहेमद चाउस (३२) हे वडिलांसह दुचाकीने जनावरे खरेदीसाठी तालुक्यात आले होते. परंतु, व्यवहार न झाल्याने ते अमरावतीला परत जाण्यासाठी निघाले. मार्गात सावळा गावानजीक अचानक एक कार त्यांच्या दुचाकीच्या आडवी आली. त्यानंतर दुचाकीवरून दोघे तेथे आले. कारमधील तिघे आणि दुचाकीवरून आलेले दोघे अशा पाच लुटारूंनी इमरान चाउस आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करून त्यांच्या जवळील १ लाख १० हजार रुपयांची रक्कम हिसकाविली.

    राजेश टोपेंशी फोनवर बोलणं झालं नाही, शिवीगाळ करणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर लोणीकरांचं स्पष्टीकरण

    त्यानंतर लुटारू तेथून पळून गेले. या प्रकरणी इमरान चाउस यांनी दत्तापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. जनावरे खरेदीच्या व्यवहारातील १० हजार रुपये देणे बाकी असल्याच्या कारणावरून संकेत पोहाणे, प्रणय पोहाणे, सचिन कुंभरे आणि अन्य दोघांनी आपल्यासह वडिलांना मारहाण करून १ लाख १० हजार रुपये हिसकाविल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू राठोड करीत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed