नागपूर : राज्यात सत्तांतरणादरम्यान व्हीप झुगारणाऱ्या आमदारांविरुद्धची अपात्रतेची सुनावणी सध्या नागपुरात विधानभवनात सुरू आहे. यातील आमदारांच्या साक्षी बयानातील काही वक्तव्ये गाजत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत (शिंदे गट) यांना विधान परिषदेचे सदस्य अनिल परब (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी या साक्षीवरून सभागृहात कामकाजादरम्यान टोमणे मारले. त्यावर सामंतांनी त्यांच्या शैलीत शांतपणे प्रत्युत्तर दिले.
मुंबईतील रस्त्यांवरील मुद्द्यांवर माहिती देताना उद्योग मंत्री सामंत यांनी त्यांच्या लंडन प्रवासातील किस्सा सांगितला. तेथील मराठी लोकांनी मुंबईतील विकासाचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादीचे सचिन अहिर म्हणाले, ‘तुम्ही लंडनला जा, पॅरिसलाही जा, फक्त तुमच्या पैशांनी जा म्हणजे झाले. कारण तसंही तुम्ही साक्षीदरम्यान तसेच सांगितले आहे.’

यावर सामंतांनी शांतपणे या टोमण्यावर आक्षेप घेतला. तुम्ही साक्षीवरील वक्तव्यावर उत्तर देऊ नका, अशी सूचना त्यांना उपसभापतींनी केली. मात्र, ‘अहिरांनी माझ्या साक्षीतील १९९९च्या सुधारणेवर जे बोललो आहे, त्याचे तंतोतंत पालन करावे, म्हणजे झाले’, असा उपरोधिक टोमणा मारला.
आमची कागदपत्रे तुम्हाला खोटी वाटतात
पदोन्नतीचे निकष न पाळता मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना अचानक वरील पदांवर बढत्या देण्यात आल्या, असा आरोप यावेळी ॲड. अनिल परब यांनी केला. त्याबाबतची कागदपत्रेसुद्धा सादर केली. ‘तुम्हाला आमची कागदं खोटीच वाटतात ना?’ असा टोमणाही मारला. सामंतांनी व्हीपवरील सही आपली नसल्याचे साक्षी दरम्यान नोंदविले आहे, हे विशेष.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News