म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे. असे असतानाही सरकार शेतकऱ्यांसाठी चुकीच्या योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी विचारत सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले.
राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर अल्पकालीन चर्चेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले. केंद्राने कापसाचे ६ हजार भाव जाहीर केले. ८ हजार ८८६ दर मिळाला तर १५ टक्के नफा मिळतो. नफा न घेता माल विकावा लागत आहे. इतर पिकांचीही हीच स्थिती आहे. तिकीट मागण्यासाठी जावे लागत असल्याने आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सोईची भूमिका घेतात, असे म्हणत इतर आमदारांवरही त्यांनी टीका केली.

‘मी पक्षासोबत बेईमानी करेल, मात्र शेतकरी या माझ्या बापासोबत करणार नाही’, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ५ लाखांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ २३ हजार कोटी आले. बजेटमध्ये शेतकऱ्यांचे स्थान नगण्य आहे. शेतकऱ्यांच्या संख्येनुसार बजेटमध्ये भागीदारी द्या. कोणत्याच पक्षात ही धमक नाही. सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र असूनही शेतकरी दुर्लक्षित आहे, असे बच्चू कडू म्हणाले.