• Mon. Nov 25th, 2024
    वकिलाचा शेतात यशस्वी प्रयोग! झारखंडमधून रोपे आणली; तीन एकरात पेरूची लागवड, मिळवला लाखोंचा नफा

    धाराशिव: उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने आपल्या तीन एकर शेतामध्ये वडिलांच्या सहकार्याने पेरूची बाग फुलवली आहे. या पेरूच्या बागेतून फक्त वीस महिन्यात लाखांचा नफा कमावला आहे. धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील अजिंक्य मगर हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी वकिली करत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले.
    राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती
    याआधी त्यांनी कांदा लागवड केली होती. काही क्षेत्रावर त्यांनी आंबा लावला. नंतर त्यांनी वडिलांच्या आणि मोहोळ येथील समाधान भोसले यांच्या सहकार्याने व्ही. एन. आर. जातीच्या पेरूची तीन एकरावर लागवड केली. व्ही. एन. आर. जातीची रूपे त्यांनी झारखंड येथून १४८० रोपे विकत घेतली. त्यांना १ रोप २२० रुपयाला घरपोच मिळाले. दोन रोपांतील अंतर ६ फूट आणि दोन ओळींतील १२ फूट अंतरावर लागवड केली. त्या रूपाला आधार म्हणून तारांचे कुंपण घातले. यासाठी त्यांना एकरी एक लाख रुपयांचा खर्च आला. रोपे लावल्यापासून पंधरा महिन्यात या रोपांना फळ लागायला सुरुवात झाली.

    त्यानंतर १५ महिन्यात झाडांना फळ यायला लागले. चक्क २० महिन्यात त्याची तोडणी करायला आली. एका झाडाला तब्बल २० किलोपर्यंत माल निघतो, असं त्यांनी सांगितलं. मगर यांनी मार्केटचा अंदाज घेत कोचीन या ठिकाणी आपल्या पेरूची विक्री केली. एका किलोला त्यांना ८५ रुपये हायेस्ट दर मिळाला. तर ३५ टन एवढे उत्पादन त्यांना तीन एकर मधून पेरुचे मिळाले. व्ही. एन. आर. जातीचा एक पेरू तब्बल ८०० ग्रॅम वजनाचा भरतो. खायला चवदार असून आतमध्ये बियांचे प्रमाण कमी आहे.

    नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंची हजेरी, सेल्फी घेण्यासाठी अनेकांची गर्दी

    लागवडीपासून अजिंक्य मगर यांचा जवळपास १२ लाखांच्या घरात खर्च झाला असून यातून त्यांना तब्बल २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मगर असे सांगतात की इतर शेती करण्यापेक्षा पेरूची बाग नक्कीच फायदेशीर ठरली आहे. कारण त्याला लागवडीनंतर इतर छाटणी व्यतिरिक्त कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे ते तरुणांना असे बेरोजगार म्हणून न राहता शेतीकडे नक्कीच व्यवसाय आणि नवनवीन प्रयोग करा, असे ते सांगतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *