• Mon. Nov 25th, 2024

    सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक

    सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही बंदी उठविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १०) रात्री केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची मुंबईत भेट घेतली. याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन गोयल यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’वरून दिली. दरम्यान, कांदा निर्यातप्रश्नी सोमवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

    केंद्र सरकारतर्फे कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असून, याप्रश्नी राज्यातील राजकारणही तापू लागले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी याप्रश्नी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची नुकतीच भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनीही केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी ‘एक्स’वरून केली होती. त्यानंतर आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले असून, शनिवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

    काठी नका मारू, थेट गोळीच घाला साहेब; संतप्त शेतकऱ्यांची मागणी, कांदा निर्यातबंदीला जोरदार विरोध

    ‘सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन’

    ‘शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. पीयूष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली. कांदाप्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. पीयूष गोयल यांच्यासोबत ही बैठक होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकऱ्यांचं नाशकात आंदोलन, केंद्रीय मंत्री भारती पवार यांना लावला फोन

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *