• Sun. Sep 22nd, 2024

पडघ्यात IS चं कंबरडं मोडलं, मुख्य सूत्रधाराला बेड्या, ‘सिमी’प्रमाणे तरुणांना खेचण्याचा प्रयत्न

पडघ्यात IS चं कंबरडं मोडलं, मुख्य सूत्रधाराला बेड्या, ‘सिमी’प्रमाणे तरुणांना खेचण्याचा प्रयत्न

ठाणे : जवळपास दहा वर्षांपूर्वी पडद्याआड गेलेल्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेप्रमाणेच ‘आयएस’चे जाळे उभे करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून भिवंडी तालुक्यातील पडघा येथे होत होता, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कारवाईनंतर समोर आली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेला कुख्यात साकिब नाचण हाच यामागील मुख्य सूत्रधार असल्याने तो आता चौकशीच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘एनआयए’ने शनिवारी महाराष्ट्र व कर्नाटकात ४४ ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली. त्यांच्यासह हमासचे झेंडे, दहशतवादी साहित्य, पिस्तुल, रोख रक्कम आदी जप्त करण्यात आली. यापैकी सर्वाधिक छापे ठाणे शहर व जिल्ह्यात होते. या १५ जणांमध्ये अटक करण्यात आलेला साकिब नाचण हा महत्त्वाचा दुवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला
संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचण हा सन २००२ पासून दहशतवादी कृत्यात सहभागी होता. स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सिमी’ या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या पाठबळावर त्याने सन २००६ मध्ये मुंबईच्या लोकमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप होता. त्यानंतर काही वर्षे तो शांत होता. मात्र आता आयएसचे (इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक) ‘महाराष्ट्र मॉड्यूल’ पुणे व ठाण्यात उभे राहत असताना तो पुन्हा सक्रिय झाला.

लेकीच्या लग्नानंतर ८ कोटींचे दागिने रिक्षात विसरले, बाबांना ब्रह्मांड आठवलं, पुढच्या तासाभरात…
‘सिमी’चा अनुभव पाठीशी असल्याने ‘आयएस’चे जाळे उभे करण्याची तयारी त्याने केली होती. या जाळ्याचा विस्तार ठाण्याबाहेर पुणे व कर्नाटकात करण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र आणखी काही ठिकाणी दहशतवादी जाळे विणले गेल्याची शक्यता आहे. त्यासाठीच साकिब नाचणची कसून चौकशी केली जात आहे.

कसाबला जिवंत पकडणं किती महत्त्वाचं होतं हे मला आता समजतंय, २६/११ हल्ल्यातील चिमुरडीचा संघर्ष कायम

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed