नागपूर: मिग्जॉम वादळाच्या फटक्यातून आता विदर्भ सावरला आहे. रविवारी शहरात १२.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चोवीस तासांत शहराच्या किमान तापमानात अचानक ४.३ अंशांनी घसरण झाल्याने नागपूरकरांचे स्वेटर, मफलर बाहेर निघू लागले आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विविध मोर्च्यामुळे राजकीय वातावरण तापत असताना सोबतच थंडीसुद्धा तापणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने आणि त्यानंतर लागलेल्या पावसाच्या हजेरीने शहरात अचानक सर्द वातावरण तयार झाले. यामुळे बोचरी थंडी जाणवू लागली होती. दिवसाचे तापमान २२ अंशांच्या आसपास होते. मात्र, किमान तापमान १९ अंशांच्या आसपास होते. त्यामुळे दिवसा थंडी जाणवत होती. वास्तविक पाहता रविवारचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा केवळ ०.१ अंशांनीच कमी होते.

मात्र, ढगाळ वातावरणचेही कोरड्या वातावरणात रुपांतरण झाले. यामुळे पारा अचानक ४.३ अंशांनी घसरला आणि थंडी जाणवू लागली. १३ डिसेंबरपर्यंत तापमान सरासरी तापमानाच्या आसपास राहण्याची तर त्यानंतर १४ ते २० डिसेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षाही खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता थंडीला सुरुवात झाली असून पुढील काळात थंडी अजूनच वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिलेत.