• Mon. Nov 25th, 2024

    छगन भुजबळ शक्तीप्रदर्शन करणार, नांदेडच्या महामेळाव्याला दिग्गजांना निमंत्रण, राज्याचं लक्ष

    छगन भुजबळ शक्तीप्रदर्शन करणार, नांदेडच्या महामेळाव्याला दिग्गजांना निमंत्रण, राज्याचं लक्ष

    नांदेड : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून विविध जिल्ह्यात सभा घेतल्या जात आहेत. त्यातच नांदेडमध्ये जरांगे पाटील यांच्या सहा सभा पार पडल्या. या सर्व सभेत जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात जोरदार टीका केली. आता जरांगे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी नांदेडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील नरसी नायगाव येथे हा मेळावा पार पडणार आहे.

    भुजबळ यांच्या महामेळाव्याचं ७० एकरच्या मैदानावर नियोजन करण्यात आलं आहे. या महामेळाव्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शिवाय या महामेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण दिले आहे, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे समन्वयक डॉ. बी. डी. चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. यावेळी अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे, दत्तात्रय मोहिते, प्रकाश राठोड यांची उपस्थिती होती. आयोजकांच्या वतीने मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

    OBC Elgar Sabha: ओबीसींना पूर्ण आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची एल्गार मेळाव्यातून मागणी
    ७० एकरमध्ये पार पडणाऱ्या या महामेळाव्याला ४ लाखांहून अधिक ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. नांदेडमध्ये होणाऱ्या या पहिल्या सभेत छगन भुजबळांसह ओबीसी नेते मनोज जरांगेंबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.

    मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप… असं जरांगे कोणाला म्हणाले?
    दरम्यान, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यात चार सभा घेण्याचं नियोजन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यातील नरसी नायगाव येथील पहिली सभा पार पडल्यानंतर माहूर, भोकर माळेगाव आदी ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. या सभेची लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed