• Mon. Nov 25th, 2024

    जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, अदानी इलेक्ट्रीसिटीच्या कंत्राटदाराला दणका, BMC वसूलणार दंड

    जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, अदानी इलेक्ट्रीसिटीच्या कंत्राटदाराला दणका, BMC वसूलणार दंड

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: दहिसर पूर्वेकडील जलवाहिनी फुटल्याची घटना ५ डिसेंबरला घडली होती. या नुकसानीस जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडून मुंबई महापालिका ३ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल करणार आहे. पाणी वाया जाण्याचे शुल्क, जलवाहिनी दुरुस्ती आणि दंडाची रक्कम या रकमेमध्ये समाविष्ट आहे.

    दहिसरजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टोल प्लाझाजवळ ५ डिसेंबरला रात्री एका खासगी कंत्राटदाराने केलेल्या देखभालीच्या कामावेळी ३०० मीटर लांबीची जलवाहिनी फुटली. पालिकेच्या जलअभियंता विभागाला दुसऱ्या दिवशी ही गळती निदर्शनास आल्याने तातडीने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या जलवाहिनीद्वारे दहिसरमधील केतकीपाडा आणि परिसराला मुख्यतः पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांचे हाल झाले होते.

    कांदा पुन्हा रडवणार! पावसाळ्यापर्यंत दर चढेच, अवकाळीने मोठे नुकसान, जाणून घ्या किलोचा भाव…

    अदानी इलेक्ट्रिसिटी लिमिटेडच्या केबल देखभालीचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने खोदकामासाठी पूर्वपरवानगी घेतली होती, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल ५० टक्के दंड त्याच्याकडून वसूल केला जाईल. सुमारे ५२ लाख लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे हे वाया गेलेले पाणी आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी २ लाख १८ हजार ४४ रुपये आणि १ लाख ९ हजार २२ रुपये असा एकूण ३ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्याची नोटीस कंत्राटदाराला बजावली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

    तसेच कारणे दाखवा नोटीसही पाठवली असून सात दिवसांत कंत्राटदाराला उत्तर देण्यास सांगितले आहे. याआधी ३० नोव्हेंबरला अंधेरी पूर्वेकडील १,८०० मिमी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती. याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर १ कोटी ३३ लाख रुपये वसुलीची नोटीस मुंबई पालिकेने बजावली होती. ही जलवाहिनी फुटल्याने उपनगरात पाण्याचे तीव्र संकट निर्माण झाले होते.

    मुंबई आंदण देणार नाही, धारावीसाठी उद्धव ठाकरेंचा मोर्चा अदानींच्या कार्यालयावर धडकणार

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *