• Mon. Nov 25th, 2024

    पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ

    पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ

    पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे आणि परिसराच्या भागात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. आज ( शुक्रवार ) पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि फटाक्याचे गोदामाला भीषण आग लागून त्यामध्ये ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे . वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि फटाक्याचे गोदाम होते. त्या गोदामाला ही आग लागली. या गोदामात सगळ्या ज्वलनशील वस्तू असल्यामुळे आग वेगाने पसरली. काही कळण्याच्या आत आगीने संपूर्ण गोदाम व्यापले. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कामगारांना निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता आहे.

    गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे शहर आणि परिसरातील आगीची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी गेल्या आठ ते नऊ महिन्यात पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत.

    गेल्या काही महिन्यांमध्ये कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना?

    > मे महिन्यामध्ये पुणे शहरातील वाघोली येथील एका गोडाऊन मध्ये चार सिलेंडर फुटले होते यामध्येतीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

    >जून महिन्यात मार्केट यार्डमधील हॉटेल रेवळ सिद्धी येथे लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

    >याच महिन्यात महिन्यातच पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचा नुकसान झालं होतं. या आगीत अनेकांना बेघर व्हावे लागलं होतं.

    > पुन्हा जुलै महिन्यात कोंढवा येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत देखील लाखो रुपयांच नुकसान झाले होते.

    > ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवडमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला.

    ऑक्टोंबर महिन्यात पुण्यातील सिंहगड रेट्यावरील गाडयांच्या शोरुमला आग लागली होती. त्या आगीत २५ मोटारसायकल जळून खाक झाल्या. पुणे शहरातील सिंहगड रोडवर नवशा मारुती मंदिरामागे दुचाकीचे शोरुम आहे. टिव्हीएस कंपनीचे हे शोरुम आहे. या ठिकाणी सकाळी ७.४५ मिनिटांनी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच पुणे मनपाच्या अग्निशमन दलाची ५ वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्नीशमन दलाने दीड, दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत सर्व्हिस सेंटरमधील २५ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

    पुण्यातील वेस्टलँड मॉलला रेस्टॉरंटमध्ये २३ नोव्हेंबर रोजी आग लागली. पुण्यातील वेस्टएंड मॉलमध्ये लागलेली आग भीषण होती. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने मॉलमध्ये असणाऱ्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील औंध भागात असलेल्या वेस्टएंड मॉल आहे.

    इतकंच नाहीतर दिवाळीच्या दिवशी १२५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता आगीच्या घटनांवर नियंत्रण कसे ठेवावे याकडे गांभीर्य आणि पाहण्याची गरज बनत आहे. आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र आग लागल्यानंतर एखादाच्या घरातील दिवा विझल्यानंतर यावर उपाययोजना करण्यासाठी शासन आणि प्रसासनाला जाग येत असेल तर ही खऱ्या अर्थाने शोकांतिकाच म्हणावी लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *